चेन्नई, 28 एप्रिल : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जवर मोठा विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावलंय. राजस्थानने आतापर्यंत 8 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. चेन्नईला या पराभवामुळे दणका बसला. पहिल्या स्थानावरून चेन्नई सुपर किंग्जची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.
चेन्नईशिवाय गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांचेही प्रत्येकी दहा गुण आहेत. मात्र धावगती चांगली असल्यानं राजस्थान पहिल्या तर गुजरात दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये टॉप 4 संघात चौथ्या स्थानी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्ससुद्धा आहे. त्यांचे 8 गुण झाले आहेत.
IPL 2023 : RCB साठी कायपण! जिंकत नाय तोपर्यंत शाळेत जाणार नाही, चिमुकलीचा Photo Viral
राजस्थान रॉयल्स विरुद्ध सीएसके सामन्यातआधी चेन्नई सुपर किंग्जचा संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी होता. तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र राजस्थान रॉयल्सने चेन्नईला तब्बल 32 धावांनी धूळ चारत पहिलं स्थान पटकावलं. राजस्थानच्या या विजयानंतर त्यांची धावगती चांगली असल्यानं गुणतालिकाते त्यांनी बाजी मारली.
आरसीबी आणि पंजाब हे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. त्यांचे प्रत्येकी 8 गुण झाले आहेत. केकेआर आणि मुंबई इंडियन्स यांचे प्रत्येकी 6 गुण झाले असून केकेआर सातव्या तर मुंबई आठव्या क्रमांकावर आहे. सनरायजर्स हैदराबाद नवव्या तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या स्थानी आहेत. गुणतालिकेत शेवटच्या दोन संघांचे प्रत्येकी 4 गुण झाले आहेत.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने मैदानावर तुफान फटकेबाजी करून राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. राजस्थान रॉयल्सकडून यशस्वीने 77 , जॉस बटलरने 27, संजू सॅमसन 17 , धुर्व जुरेल 34 तर देवदत्त पड्डीकलने 27 धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची सुरुवात खराब झाली. राजस्थानचा गोलंदाज संदीप शर्माने 6 ओव्हरमध्ये कॉनवेची विकेट घेतली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 47, अजिंक्य रहाणेने 15, मोईन अलीने 23 , शिवम दुबेने 52 तर रवींद्र जडेजा 23 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.