मुंबई, 15 मे : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने मोठ्या फरकारने विजय मिळवला. आरसीबीने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. कर्णधार फाफ डुप्लेसि आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने 5 बाद 171 धावा केल्या. राजस्थान हे आव्हान सहज पूर्ण करेल असं म्हटलं जात होतं. पण आरसीबीच्या गोलंदाजीसमोर राजस्थानचा संघ फक्त 59 धावात गुंडाळला. आरसीबीने हा सामना तब्बल 112 धावांनी जिंकला. विराट कोहलीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी गोलंदाजी केली असती तर राजस्थानचा संघ यापेक्षा कमी धावांवर बाद झाला असता.
आरसीबीने ड्रेसिंगरुममधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रत्येक खेळाडू सामन्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडीओत विराट कोहली हे बोलताना दिसतो की, जर मी या सामन्यात गोलंदाजी केली असती तर राजस्थानचा संघ 40 धावांवर ऑलआऊट झाला असता.
”IF I HAD BOWLED, THEY WOULD HAVE BEEN ALL OUT FOR 40″- Virat Kohli 😁#ViratKohli #RCBvsRR #RRvRCBpic.twitter.com/ygjF2Awj3y
— VK 18 FAN (@Deba32644) May 15, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.