मुंबई, 17 मे : भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरेंवर टीका करतानाच फडणवीस यांनी पुढची रणनीतीही सांगून टाकली आहे. ‘आमचे उद्धवजी राजे-महाराजेंपेक्षा कमी नाहीत. एका राजाला पोपट फार आवडत होता आणि पोपट मेला. आता प्रश्न राजाला सांगेल कोण पोपट मेला? जो सांगेल त्याचा शिरच्छेद होणार. त्यामुळे कसा आहे आमचा पोपट? पोपट तर साहेब ठिक आहे, पण काही खात नाही, पित नाही, बोलत नाही. अशीच या निर्णयानंतर शिवसेनेची अवस्था झाली आहे, त्यांना माहिती आहे हा पोपट मेला आहे’, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंचं मिशन ‘लोकसभा’, सुषमा अंधारेचा मतदारसंघ निश्चित!
‘राजाचा जीव पोपटामध्ये आहे, तर दुसरा पोपट कुठला आहे? बीएमसी. हा राजकीय प्राण नाही कुरण आहे. 25 वर्ष हे कुरण खाऊन खाऊन ते मोठे झाले आहेत’, असं फडणवीस म्हणाले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘मुंबई महापालिका आपल्याला जिंकायची आहे. कुणाला महापौर-उपमहापौर करण्याकरता नाही, मुंबईची महापालिका आपल्याला मुंबईच्या जनतेला सोपवायची आहे. मुंबईची तिजोरी मुंबईच्या जनतेच्या हातामध्ये द्यायची आहे. सगळ्यांनी दर ताकद लावली तर मुंबईच्या महापालिकेवर भाजप-शिवसेना-आरपीआय युतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही’, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकर लोकसभा लढवणार? ठाकरे बालेकिल्ला सोडायला तयार!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.