सोलापूर, 7 मे : शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेऊ नये यासाठी पक्षातील अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा परत घेऊ नये म्हणून भाजपवाल्यांनी देव पाण्यात ठेवले होते असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया
दरम्यान शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर यावर देखील शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मीच अजित पवार यांना पत्रकार परिषदेत न येण्यास सांगितलं होतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (सोलापूर)
Video : नातीच्या वाढदिवसाला आजोबांचं स्पेशल गिफ्ट; अन् गडकरी कुटुंबासह पोहोचले दुकानात
सरकारला टोला
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. मात्र अजूनही मदत मिळालेली नाहीये. राज्यात लोकांना बदल हवा आहे. विरोधकांची एकजूट व्हावी हीच आमची इच्छा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.