मुंबई, 20 एप्रिल : खारघर येथे आयोजित ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे तब्बल 14 लोकांनी आपला जीव गमावला. यानंतर विरोधक आक्रमक झाले असून आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते यांनी आज राज्यपालांना पत्र लिहून यासंबंधी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. यांचे राजीनामे का मागितले जाऊ नये असा प्रश्नही ठाकरे यांनी विचारला आहे.
भाजप वापरते आणि सोडून देते : उद्धव ठाकरे
तुमच्या शहरातून (मुंबई)
वज्रमुठ सभा संध्याकाळी होत आहेत. आतापर्यंत दोन सभा झाल्या. त्या संध्याकाळी झाल्या. त्यामुळे परवानगी नाकारण्याचे कारण नाही. परवानगी मिळाली की नाही मला माहिती नाही. मात्र, खारघरचे आयोजन केलेल्या लोकांकडून आम्ही वज्रमुठ सभेसाठी सल्ला घेणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आयोजक कुठे गेले आहेत? सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. नानासाहेबांच्या अनुयायांचा राजकिय फायदा करून घेण्यासाठी आयोजन केले होते. आजवर महाराष्ट्र भुषण पुरस्कार झाले नाहीत का? राजिमाने का मागितले जाऊ नये. खरतर नैतिकता दाखवून त्यांनी राजिनामे द्यायला पाहिजे. आयोजकांनी जबाबदारी स्विकारायवा हवी. भाजप हेच करते वापरते आणि सोडून देते. ते नेहमीच असे करतात, असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे.
वाचा – महाराष्ट्र भूषण सोहळ्यात तो तर अपघात, राज ठाकरेंची नवी भूमिका
अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अजित पवार म्हणाले, खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप 14 अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा खारघरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्यभरातून सुमारे 20 लाख अनुयायी उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान अनेक अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला. लाखो अनुयायी तब्बल 7 तास उन्हात होते. अनेकांना चक्कर आली, अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. या दुर्दैवी घटनेत 13 निष्पाप अनुयायांचा नाहक बळी गेला. घटनेच्या दिवशीच मी स्वतः नवी मुंबईतील एम.जी. एम. रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि डॉक्टरांची भेट घेतली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता, असे अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.