मुंबई, 6 एप्रिल : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यानंतर स्थानिक निवडणुकांच्या कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी पार पडला होता. आता राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली.
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत.
( ‘सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी’ भाजप नेत्याची टीका, म्हणाले, दोघींच्यात..)
नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होणार आहे.
(गुणरत्न सदावर्तेंची भाषा आक्रमक, आवाजही मोठा.. हायकोर्टात नेमकं काय घडलं?)
दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत 7751 निवडणूक पार पडली. या निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी हा दुसरा स्थानावर आहे. तर शिंदे गटाने तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना ही पाचव्या स्थानावर आहे. राज्यात शिंदे आणि भाजप सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीला पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने आघाडी घेतली. तर महाविकास आघाडीनेही कडवी टक्कर दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.