पुणे, 08 एप्रिल : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल दिवसभर विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. झालेल्या वादळी पावसाने हवामान दमट झाल्याने उष्णता भयानक वाढल्याचे आढळून आले. दरम्यान राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असताना पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज (दि.08) शनिवारी राज्यातील वादळी पाऊस, गारपिटीचा इशाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.
पुढचे 48 तास महत्वाचे राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान विभागाचा इशारा
तुमच्या शहरातून (मुंबई)
तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे.
आज राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी दुपारपासून तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यात वादळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने कांदा, लिंबू व खरबूज आदी पिकांचे नुकसान झाले. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली होती.
काल झालेल्या पावसाने राज्यातील विविध भागात तापमान कमी जास्त होत आहे. मागच्या 24 तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, ब्रह्मपुरी येथे तापमान 40 अंशांवर होते. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा 14 ते 25 अंशांच्या दरम्यान स्थिरावला आहे.
विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, पिकांचे मोठे नुकसान
दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 37.2 (19.9), जळगाव 39 (20.3), धुळे 37.5 (18.2), कोल्हापूर 38.1 (24.2), महाबळेश्वर 31.1 (16), नाशिक 37.3 (20.7), निफाड 37.2 (14.1), सांगली 39 (24.9), सातारा 37.5 (21.4), सोलापूर 40.2 (24.1), रत्नागिरी 33 (23.4), छत्रपती संभाजीनगर 36 (22), नांदेड 38.8 (23.2), परभणी 39.4 (25), अकोला 40 (25.8), अमरावती 38.6 (24), बुलडाणा 36.5 (23.2), ब्रह्मपुरी 40 (22.4),गडचिरोली 34 (20), गोंदिया 38 (21.8), नागपूर 37.4 (21.9), वर्धा 39.8(24), वाशीम 39.6 (20.2) यवतमाळ 39 (24.5) तापमानाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.