पुणे, 28 मार्च : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरील लावली. दरम्यान राज्यातील तापमानात चढ उतार होत आहे. यामुळे कधी हिवाळा तर कधी पावसाळा तर अचानक उन्हाच्या झळा जाणवत असल्याची स्थिती आहे. दरम्यान राज्यात उन्हाळा वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 38 अंशांच्या पार पोहोचला आहे. यामुळे उष्णतेत मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान बगांलच्या उपसागरात अद्यापही कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरीत भागात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. विदर्भीतील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे. यामुळे काही जिल्ह्याना हवामान विभागाने इशारा दिला आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो, कृषी विभागानं दिला तुमच्या पिकांसाठी महत्त्वाचा सल्ला!
तुमच्या शहरातून (पुणे)
राज्यातील वर्धा येथे उच्चांकी वर्धा 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती व यवतमाळ येथे कमाल तापमान 38 अंशांच्या पुढे होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 32 ते 37 अंशांच्या दरम्यान होते. तर, किमान तापमानातही चढ-उतार होत असून, बहुतांश ठिकाणी पारा 12 अंशांच्या पुढे कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान 10.5 अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली.
छत्तीसगडपासून, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तमीळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. ओडिशापासून झारखंडपर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्या (ता. 29) पासून विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
औषधी झाडाला गैरसमजुतीचा फटका, आरोग्याचं कवच असलेली ‘खाज’ वनस्पती धोक्यात!
पुणे 34.6 (13.6), जळगाव 35.7 (19.5), धुळे 34.5 (15.8), कोल्हापूर 35.6 (18.7), महाबळेश्वरr 29.9 (13.8), नाशिक 31.7 (16.6), निफाड 33.2 (10.5), सांगली 35.7 (17.1), सातारा 35.2 (13.6), सोलापूर 37.0 (20.9), रत्नागिरी 31.1 (20.7), छत्रपती संभाजीनगर 34.3 (18.2), नांदेड 37.6 (20.8), परभणी 37.5 (20.4), अकोला 38.3 (18.6), अमरावती 38.0 (18.1), बुलडाणा 34.0 (20.6), चंद्रपूर 30.2 (21.8), गडचिरोली 35.4 (19.0), गोंदिया 36.0 (19.6), नागपूर 35.8 (20.2), वर्धा 38.6 (21.5), वाशिम 35.4 (20.0), यवतमाळ 38.0 (18.0).
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.