मुंबई, 8 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार कालपासून नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी शुक्रवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले, त्यानंतर त्यांनी त्यांचा कॅनव्हॉय आणि स्टाफ सोडला आणि ते खासगी गाडीतून रवाना झाले आहेत. पण ते नेमके कुठे गेले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
शरद पवारांचा फोन
अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला आणि त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना कॉनव्हॉय म्हणजेच गाड्यांचा ताफा आणि स्टाफ असतो. हा कॉनव्हॉय आणि स्टाफ अजित पवारांनी सोडून दिला आहे, त्यामुळे दादा नेमके कुठे गेले? याबाबत पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटलं आहे. त्यातच आता सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
किळसवाणी राजकारण
मी पुन्हा येईन pic.twitter.com/mGY1k2720i
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 7, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.