मुंबई, 7 मे : भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांबाबत खळबळजनक दावा केला आहे. राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. येत्या आठवड्यात हा भूकंप होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिला नसल्यानं आता संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या पवारांसोबत अनेक बैठका झाल्याचा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले राणे?
राज्यात पुढच्या आठवड्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार आहे. संजय राऊत यांच्या शरद पवारांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता राहिला नसल्यानं संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांची भूमिका पहा ते कायम अजित पवारांवर टीका करत आले आहेत. संजय राऊत यांची अशी अट आहे की, ज्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडतील त्यादिवशी ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं राणे यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
पवारांचा मणिपूर सरकारला एक फोन अन् पालकांनी सोडला सुटकेचा निश्वास; गोविंद बागेत नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरेंना टोला
दरम्यान यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. बारसू बळजबरीनं लादल्यास महाराष्ट्र पेटवू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी महाविकास आघाडीची मदत न घेता स्वत:च्या ताकतीवर आधी मुंबई बंद करून दाखवावी असं चॅलेंज नितेश राणे यांनी ठाकरेंना दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.