मुंबई, 8 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यात आहेत. याअगोदर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करत सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन करणारे ट्विट केलं होतं. मात्र, आता जे ट्वीट राज ठाकरेंनी केलं आहे त्यामध्ये राज ठाकरेंनी काही तासात भूमिका बदलल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन ट्विटमध्ये महाराष्ट्र एकीककरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं म्हटलं आहे.
राज ठाकरेंचा यू टर्न?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होतं आहे. आज प्रचार संपला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये खरी लढत असली तरी महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. अशात राज ठाकरेंनी एका दिवसात दोन भूमिका बदलल्याचं पाहण्यास मिळालं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की सीमाभागातल्या मराठी उमेदवारांनाच निवडून द्या. मग तो कोणत्याही पक्षाच असो. पण, अवघ्या काही तासांमध्ये त्यांनी आपली भूमिका बदलत आधीचं ट्वीट डिलिट करून नवी भूमिका मांडली आहे. या ट्वीटमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) May 8, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.