मुंबई, 4 एप्रिल : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्यात आल्याचा, तसंच तिकडे जाऊन काही जण दर्शन घेत असल्याचा व्हिडिओ दाखवला होता. ही मजार हटवली नाही, तर त्याच्या बाजूलाच गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि 24 तासांच्या आत माहीमच्या समुद्रातली मजार हटवण्यात आली. पण आता मजार असलेल्या भागातलाच व्हिडिओ समोर आला आहे. या भागामध्ये अजूनही नागरिकांची ये-जा सूरू असल्याचं दिसत आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मनसेची प्रतिक्रिया
दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘राज ठाकरेंनी विषय मांडल्यानंतर सरकारने 24 तासांमध्ये कारवाई केली आहे. माहीम पोलिसांनी आणि प्रशासनाने तिकडे लक्ष देण्याची गरज आहे. तिकडे पुन्हा अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र सैनिक सुसज्ज आहेत. यंत्रणांनी जागं व्हावं, झोपेचं सोंग घेऊन चालणार नाही. राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर सरकारने कारवाई केली, याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यानंतरही या गोष्टी सुरू असतील तर त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे’, अशी मागणी मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.