रत्नागिरी, 6 मे : रत्नागिरीमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा आहे. रत्नागिरीमधील सभेला जात असताना मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. देवा साळवी असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. ते दहीसर मनसेचे उपाध्यक्ष होते. या अपघातामध्ये अन्य तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्यावर संगमेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या अपघाताबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे. सकाळी अपघातामध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये काही जण जखमी झाले हेते, त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. जेव्हा पत्र दिलं तेव्हाच का नाही प्रकल्पाची माहिती घेतली तेव्हा घरात होतात असा टोला संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
शरद पवारांनी अचानक राजीनाम्याचा निर्णय का घेतला? राऊतांचा मोठा दावा
तुमच्या शहरातून (मुंबई)
आज राज ठाकरेंची सभा
दरम्यान आज रत्नागिरीमध्ये राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेतून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.