पुणे, 05 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव 2023चे उद्घाटन झाले. राज ठाकरे हे स्वत: व्यंगचित्रकारही असून त्यांनी याआधी अनेकदा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले आहेत. पुण्यात व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांना व्यंगचित्र काढण्याचा आग्रह उपस्थितांनी केला. तेव्हा सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणीसुद्धा केली.
व्यंगचित्र काढताना राज ठाकरे असंही म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी कुंचला हाती धरलाय. बाळासाहेबांसारखी बैठक मारून चित्र काढायची सवय आहे. त्यामुळे आता जे व्यंगचित्र काढलंय ते गोड मानून घ्या. व्यंगचित्र काढणं हे माझं आवडतं काम आहे. व्यंगचित्र काढायला माझे हात रोज शिवशिवतात. पण राजकीय बैठक आणि शांतता यामुळे व्यंगचित्रासाठी वेळच मिळत नाही. बऱ्याचदा माझे व्यंगचित्र हे भाषणातून उमटतात. कला आपल्याला जे दाखवते ते विलक्षण असतं. खरंतर ही भाषण करायची वेळ नाही. मी फक्त शुभेच्छा द्यायला आलोय असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
Sharad pawar : राष्ट्रवादीच्या बैठकीतून मोठी बातमी, शरद पवारांनी घेतली नवी भूमिका
तुमच्या शहरातून (पुणे)
राज ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काही मिनिटात काढले. राज्यात जे सुरू आहे ते पाहून अजित पवार यांचे चित्र काढतो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसंच व्यंगचित्र काढून झाल्यावर आग्रह करणाऱ्यांना मिश्किलपणे आता गप्प बसा असं म्हणताच तिथे एकच हशा पिकला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्या पक्षाचे बैठकांचे सत्र सुरू आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर वाय बी चव्हाण सेंटरवर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. तेव्हा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी दरडावत गप्प बसवलं होतं. याच सगळ्या घडामोडींचा धागा पकडत राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून फटकारे मारले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.