एमके रणजित सिंग हे सौराष्ट्रातील 300 वर्ष जुन्या वांकानेर संस्थानाचे राजपुत्र होते. पण राजेशाही सोयी आणि पदवी सोडून त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात यश मिळवले आणि नंतर भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी झाले. ते मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी होते. यानंतर अनेक मोठ्या पदांवरही त्यांनी कार्य केले. त्यांनी चित्त्याविषयी लिहिलेल्या पुस्तकाची खूप चर्चा झाली. नामिबियातून चित्ता आणण्याच्या योजनेतही त्यांचा हातभार होता, असे सांगितले जाते.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीने ह्युमन्स ऑफ बॉम्बे या वेबसाईटवर तिच्या वडिलांबद्दल लिहिले होते की, ते पहिले रॉयल बनले, ज्यांनी केवळ राजेशाही पदवीचा त्याग करून आयएएसमध्ये प्रवेश घेतला नाही, तर एक निर्भय आणि अभेद्य आयएएस अधिकारी देखील बनले.
एमके रणजित सिंग यातील एमके म्हणजे महाराजा कुमार. त्यांची मुलगी आता बडोद्याची महाराणी आहेत, ज्या राधिकाराजे गायकवाड म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेमध्ये लिहिले आहे की, त्यांच्या वडिलांनी कोणत्याही दबावाशिवाय कसे काम केले तसेच भोपाळ गॅस दुर्घटनेच्या वेळी त्यांनी लोकांना बाहेर काढण्यासाठी खूप मदत केली होती.
रणजित सिंहजी यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर 15 फेब्रुवारी 1948 रोजी झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि जामनगरचे जामसाहेब रणजित सिंग यांचे खूप चांगले मित्र असल्याने त्यांना हे नाव देण्यात आले. काठियावाडजवळ असलेले हे संस्थान ब्रिटीश राजवटीत एक संस्थान होते. आता हे ठिकाण गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात येते.
झालना घराण्याने 1620 मध्ये वांकानेर संस्थानची स्थापना केली. येथील राजे झालना घराण्याचे राजे म्हणून ओळखले जात. आजही वांकानेरमध्ये या संस्थानाचे राजवाडे व मालमत्ता आहेत. राजघराण्याला पूर्वी जसा मान मिळत असे.
राजघराण्याचा सदस्य प्रथमच आयएएस झाला.
रणजितसिंग अभ्यासात खूप हुशार होते. स्वातंत्र्यानंतर देश बदलत होता. त्यामुळे त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे ठरवले. राजघराण्यातील इतर सदस्यांच्या तुलनेत ते अभ्यासात तरबेज होते. 1961 मध्ये त्यांनी आयएएसची परीक्षा दिली तेव्हा त्यांची त्यात निवड झाली. देशातील कोणत्याही राजघराण्यातील सदस्य या सेवेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती.
जर त्यांना आयएएसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना शाही पदवीसह त्यांच्या सर्व सुविधा सोडाव्या लागतील, अशी अडचण त्यात होती. पण त्यांनी तरी हे सर्व सोडत आएएसची नोकरी स्वीकारली. त्यांना मध्य प्रदेश केडर मिळाले. ते अनेक जिल्ह्यांत जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. वाइल्ड लाईफ असलेल्या अनेक जिल्ह्यात ते कार्यरत होते.
याच दरम्यान त्यांनी वन्यजीव संवर्धनाचे कामही सुरू केले. पुढे बढती मिळाल्यानंतर ते मध्य प्रदेश सरकारचे वन आणि पर्यटन सचिवही झाले.
त्याचबरोबर राज्यात राबविण्यात येणाऱ्या वन्यजीव संरक्षणाच्या सर्व योजनाही त्यांनी जाणून घेतल्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना ओळखत असल्याचेही त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते. वन्यजीव संवर्धनाबाबत केंद्रात तयार करण्यात आलेल्या धोरणांमध्ये त्यांचा सल्लाही घेण्यात आला. केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा 1972 केला तेव्हा त्याचा मसुदा तयार केला. यानंतर अनेक वन्यजीव अभयारण्य तयार करण्यात आले.
एमके रणजित सिंग हे वाइल्ड ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्षच राहिले नाहीत तर त्यांनी वन्यजीवांशी संबंधित अनेक संस्थांसोबत काम केले. नंतर त्यांनी वन्यजीवांबद्दल अ लाइफ विथ वाइल्डलाइफ – फ्रॉम प्रिन्सली टू प्रेझेंट, हे लोकप्रिय पुस्तक लिहिले. देशात वाघांसदर्भात त्यांच्या कामातून त्यांच्याबद्दल बरीच काही माहिती मिळते. मात्र, याशिवाय त्यांनी वन्यजीवांवर अनेक पुस्तकेही लिहिली. मध्य प्रदेशात त्यांची नियुक्ती झाली तेव्हा बारासिंगाची प्रजाती तेथे नामशेष होण्याच्या जवळ पोहोचली होती, पण त्यांच्या प्रयत्नांनी ती वाचवता आली. नंतर त्यांनी त्यावर द इंडियन ब्लॅकबक हे पुस्तकही लिहिले.
नुकतेच जेव्हा नामिबियातील 8 चित्ते भारतात आणून कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे यामागे एमके रणजित सिंग यांचे प्रयत्न होते. त्याच कारणास्तव त्यावेळी त्यांचे नावही चर्चेत आले होते. अनेक दशकांपूर्वी भारतातून चित्ता नामशेष झाला होता, हे सर्वांना माहीत आहे. 1947 मध्ये देशातून चित्ते नामशेष झाले होते, तर मध्य प्रदेशात कोरियाचे महाराजा रामानुज प्रताप सिंह यांनी शिकार करताना तीन जिवंत चित्त्यांना मारण्यात आले होते.
70 च्या दशकात रणजीत सिंहजींनी इराणमधून चित्ता आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता, परंतु, आणीबाणी लागू झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही आणि त्यानंतर इराणचे शाह अमेरिकेत पळून गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.