रायपूर 28 एप्रिल : अनेकदा लोक रस्त्यावर धक्कादायक स्टंट किंवा काहीतरी विचित्र कृत्य करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ विलासपूरमधून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी चालत्या स्कूटीवर वाहतूक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तरुण स्कूटी चालवत आहे आणि मुलगी हँडलकडे पाठ करून त्याच्या मांडीवर बसली आहे. हावभाव आणि हालचालींवरून असं दिसतं की मुलगी पूर्णपणे नशेत आहे.
थोडीशी चूक झाली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, पण दारूच्या नशेत असलेल्या या लोकांना ना आपल्या जीवाची चिंता आहे ना इतरांच्या. एक तर दोघांनी हेल्मेट घातलेलं नाही आणि त्यातही दोघेही दारूच्या नशेत दिसत आहेत. चालकाच्या मागे बसण्याऐवजी मुलगी त्याच्या मांडीवर बसली आहे. अशा प्रकारे दुचाकी चालवल्याने अपघात होऊ शकतो, याचा विचारही त्यांनी केलेला दिसत नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या या स्कूटीची नंबर प्लेट CG 28 K 4059 आहे. हा व्हिडिओ बुधवार 26 एप्रिल रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारासचा आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करत हे जोडपं पोलीस मैदानासमोर, रघुराज स्टेडियमच्या मागे, इम्लीपारा रोडमार्गे, जुन्या बसस्थानकानंतर, शिव टॉकीजसमोरून टिकरापारा यादव लोकलपर्यंत फिरताना दिसलं.
याआधी छत्तीसगडमधील दुर्ग शहरातही असाच एक प्रकार समोर आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दुर्ग पोलिसांनी तात्काळ चालकावर कारवाई केली. आता बिलासपूरच्या रस्त्यावर नियम मोडणाऱ्या या जोडप्यावर प्रशासन काय कारवाई करतं, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.