मुंबई, 03 मे : टेलिव्हिजनवर आजवर अनेक पौराणिक मालिका येऊन गेल्यात. त्यातील ‘रामायण’ ही मालिका सर्वाधिक प्रसिद्ध झाली. प्यार रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेसारखी अन्य कोणतीही मालिका आजवर झाली नाही. रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि सीता साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया प्रेक्षकांमध्ये इतके प्रसिद्ध झाले की प्रेक्षक त्यांना प्रत्यक्षात देव मानू लागले. आजही या कलाकारांची तितकिच क्रेझ पाहायला मिळतेय. दर रविवारी लागणारी ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आपली काम आरवून बसायचे. प्रत्येक रविवारी रामायण पाहण्यासाठी आवर्जुन घरी एकत्र यायचे. पण कोणाला फारस माहिती नसेल की राणायणाच्या एका एपिसोडसाठी किती पैसे खर्च होत होते. त्याचप्रमाणे मेकर्सना यातून किती नफा मिळत होता.
80च्या दशकात छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या रामायण या मालिकेनं इतिहास रचला. मालिकेत काम करण्यासाठी कलाकारांनी हॉलिवूडचे सिनेमे देखील धुडकावून लावले होते. रामायण सारखा अलौकिक आणि चमत्कारी शो तयार करून दिग्दर्शक रामानंद सागर यांना नवी ओळख मिळाली. 80च्या दशकात इतकी मोठी कलाकृती तयार करणं ही सोप्पी गोष्ट नव्हती. पण हे शिवधनुष्य रामानंद यांनी उचललं आणि हा प्रयोग सफल करून दाखवला.
रामायण मालिकेचा एक एपिसोड करण्यासाठी सर्वाधिक पैसे लागत होते. पौराणिक सिनेमा किंवा मालिका करायच्या असतील तर त्याचं बजेट आधापासूनच जास्त असतं. 80च्या दशकात रामायण मालिकेच्या एका एपिसोडसाठी तब्बल 9 लाख रूपये खर्च येत होतो. कारण निर्मात्यांनी मालिकेत फार लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिलं होतं. प्रत्येक सर्वोत्तम करण्याकडे त्यांचं कल होता.
कोणत्याही गोष्टी खर्च करण्याआधी त्यातून आपल्याला किती फायदा होणार आहे याचा अभ्यास आधी केला जातो. रामायणाच्या एका एपिसोडसाठी 9 लाख रूपये खर्च येणार असेल तर याचं गणित मोठ्या चलाखीनं नक्कीच करण्यात आलं असणार. रामायणाच्या एका एपिसोडवर जितके पैसे खर्च होत होते त्याहून चौपट रक्कम निर्मात्यांना परत मिळत होती. एका एपिसोडचे निर्मात्यांना 40 लाख रुपये मिळत होते. तेव्हा 40 लाख म्हणजे 4 कोटींप्रमाणे होते.
रामायणाची एकूण कमाई 30 कोटी रुपये इतकी होती. रामानंद सागर यांनी रामायणाचे एकूण 78 एपिसोड केले. प्रत्येक एपिसोड हा 35 मिनिटांचा असायचा. आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षक तितक्यात आवडीनं रामायण पाहतात. त्याचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. भारताप्रमाणेच इतर 55 देशांमध्येही रामायण मालिका टेलिकास्ट करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.