अहमदनगर, 22 एप्रिल : भाजप आमदार राम शिंदे यांनी आपण अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं होतं. राम शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर खासदार सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये सुप्त वाद सुरू आहे का? असा सवाल उपस्थित करण्यता येत होता. अखेर यावर आता सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला त्यांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही मी दिल्लीत होतो, मला त्यांच्या वक्तव्याबाबत काही लोकांनी माहिती दिली. मात्र खासदार कोण असेल हे तितकं महत्त्वाचं नसल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं सुजय विखे यांनी?
तुमच्या शहरातून (अहमदनगर)
मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, असं वक्तव्य भाजप आमदार राम शिंदे यांनी केलं होतं. यावर बोलताना सुजय विखे पाटील यांनी म्हटल आहे की, मला त्यांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही मी दिल्लीत होतो, मला त्यांच्या वक्तव्याबाबत काही लोकांनी माहिती दिली. मात्र खासदार कोण असेल हे तितकं महत्त्वाचं नाही, जितंक महत्त्वाचं नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असतील .आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, आमच्यामध्ये कुठलीही स्पर्धा नसल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
पदाची अपेक्षा नाही
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही 2024 ला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते करणार आहोत. मला हेच पद असायला हवं अशी माझी अपेक्षा नाहीये. आम्ही महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करत असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.