मुंबई, 5 मे : जगप्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेचा 16 वा सीजन आता रंगात येऊ लागला आहे. आयपीएलचे पहिले सत्र संपून स्पर्धेने आता दुसऱ्या सत्रात प्रवेश केला असून टीम्स आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी अधिकाधिक सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. अशातच गुजरात टायटन्सचा स्टार क्रिकेटर राशिद खानचा एक व्हिडिओ समोर आला असून याने फॅन्सची मन जिंकली आहेत.
आयपीएल 2023 मध्ये 48 वा सामना आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडणार आहे. हा सामना राजस्थान येथील स्वामी मानसिंह इंदूर स्टेडियमवर होणार असून या सामन्यात पॉईंट टेबलमध्ये टॉप 5 मध्ये असलेले दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी गुजरातचा ऑल राउंडर खेळाडू राशिद खान हा त्याच्या फॅन्स सोबत रस्त्यावर गली क्रिकेट खेळताना दिसला.
Rashid Khan playing street cricket with the Indian fans.
One of the most humble characters of the game! pic.twitter.com/3IelrQA11M
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 4, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.