मुंबई, 3 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी अचानक अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानं कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नव्या अध्यक्षांच्या नावाबाबत चर्चा सुरू झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादींच्या नेत्यांची नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत.
थोड्याच वेळात बैठक
दरम्यान थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या समितीच्या बैठकीला सुरुवात होणार या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादींच्या नेत्यांची नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत. मात्र या नावांमध्ये कुठेही अजित पवारांच्या नावाचा समावेश नाहीये.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय म्हटलं होतं पवारांनी?
मंगळवारी मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्ककाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. माझ्या खासदारकीचे तीन वर्ष राहिली आहेत, आता आणखी नवी जबाबदारी नको म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्या अध्यक्षांची निवड ही पक्षाच्या ज्येष्ठांच्या सल्ल्यानं व्हावी असंही पवार म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.