नागपूर, 19 मे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. ते आपल्या या दौऱ्यामध्ये सावनेर आणि काटोल विधानसभा मतदार संघाला भेट देऊन आढावा घेणार आहेत. या दौऱ्यामध्ये फडणवीस दोनही मतदारसंघात बैठका आणि सभा देखील घेणार आहेत. सावनेर हा काँग्रेसचा तर काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. सावनेर हा काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांचा मतदारसंघ आहे. तर काटोल हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे.
या दोनही मतदारसंघात महााविकास आघाडीचे आमदार असल्यानं फडणवीस यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या दोन मतदारसंघात भाजप विशेष ताकद लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. दोघांमध्ये चर्चा झाली. कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
तुमच्या शहरातून (नागपूर)
मोठी बातमी! लोकसभा जागा वाटपात ठाकरे गट दोन पाऊलं मागं? संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
महाविकास आघाडीकडून देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवड्यात शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती. मात्र ठाकरे गट शिवसेनेनं लोकसभेच्या वीस जागांवर दावा केला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जागा वाटपावरून मविआत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.