रायचंद शिंदे, प्रतिनिधी
पुणे, 29 एप्रिल : उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारलेले बंडखोर उमेदवाराने बाजी मारल्याचे समोर आले आहे. माजी सभापती देवदत्त निकम निवडून आल्याने बाजार समितीच्या आवारात एकच जल्लोष झाला. त्यामुळे आंबेगावात संपूर्ण पॅनल जरी NCP चे निवडून आले तरी गाजावाजा मात्र फक्त देवदत्त निकम यांचाच पाहायला मिळाला.
राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. पुण्यातील मंचर बाजार समिती निवडणुकीत वेगळाच निकाल समोर आला आहे. मंचर बाजार समिती निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निकम यांचे राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट कापले होते. त्यामुळे दुखावलेल्या निकम यांनी बंडखोरी करत स्वतंत्र 7 जणांचे पॅनल उभे केले होते. मात्र निकम वगळता या 7 पैकी इतर कोणीही निवडून आले नाही. तर दुसरीकडे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि भाजप नेत्यांना मात्र भोपळाही फोडता आला नाही.
तुमच्या शहरातून (पुणे)
(उद्धव ठाकरेंच्या माणसाने शिंदेंच्या शिलेदारांचा केला करेक्ट कार्यक्रम, मालेगावात चारली धूळ)
आज सकाळी 11 वाजता मतमोजणाीला सुरुवात झाली मात्र बाहेर फक्त निकम समर्थकांचीच गर्दी जमली होती. माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांची यांच्या प्रतिष्ठापणाला लागणारी ही निवडणूक होती. मात्र निकम यांनीच इथे भाव खाल्ला अशीच चर्चा रंगली.
वळसे पाटील यांचे खंद्दे समर्थक असलेल्या देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. निकम यांच्या बंडखोरीनंतर वळसे पाटलांनी सांगता सभा घेतली होती आणि निकम यांच्यावर ताशेरे ओढले होते. यामुळे मंचर बाजार समितीत वळसे पाटील गड राखणार का? या बाबत या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते “कुणी माझा फोटो लावला, कुणी झेंडा लावला तरी काळजी करण्याचं कारण नाही. काहींनी पक्षाला आव्हान देण्याचं काम केलं पण पक्षाने जे उमेदवार दिले त्यांनाच माझा पाठिंबा आहे” असं सांगत दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांना चांगलंच फटकारलं होतं. तरीही निकम मोठ्या फरकाने निवडून आले. बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ असणाऱ्या आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे गटबाजी उफाळून आली होती.
(बीड जिल्ह्यात आघाडीचा युतीला दे धक्का! भावाचा बहिणीला तर काकाचा पुतण्याला छोबीपछाड)
निकम हे मंचर बाजार समितीचे विद्यमान सभापती होते. त्यांनी शिरूर लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती.ते दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक असताना. उमेदवारी नाकारली तरी देवदत्त निकम अपक्ष निवडणूक लढवत होते.निकम यांनी यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक प्रकारे आव्हान देऊन आंबेगाव तालुक्यात खळबळ उडवुन दिली होती..यानंतर आता निकम पुढे काय करणार राष्ट्रवादी सोबत जुळवून घेणार की भाजप शिवसेनेचा मार्ग धरणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.