मुंबई, 24 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे अजित पवारच नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी भाजपला पांठिबा देणार असल्याची सुद्धा चर्च सुरू आहे. त्यातच आता शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गट शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मविआ आज आहे उद्याच सांगता येत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या या सूचक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
तुमच्या शहरातून (मुंबई)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मविआबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. मविआ आज आहे, उद्या सांगता येत नाही. मात्र आमची एकत्र काम करण्याची तयारी आहे. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या सूचक वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचं मात्र टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवारांची चर्चा
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र आता शरद पवार यांनी मविआबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.