मुंबई, 18 मे- मनोरंजन विश्वात एकापेक्षा एक गुडन्यूज कानावर पडत आहेत. आता लोकप्रिय गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांनी नुकतीच चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. सोशल मीडियावर या क्यूट कपलनं एक व्हिडिओ शेअर करत लवकरच ते आई-बाब होणार आहेत.
दिशा परमारनं नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एकदम खास आहे. यामध्ये त्यांनी आपल्या बाळाच्या हालचाली डायरेक्ट सोनोग्राफी रुममधून शेअर केल्या आहेत. तिनं म्हटलं आहे की, भावी मम्मी-पप्पा हॅलो…फॉर बेबी..तिच्या या पोस्टवर कमेंटचा महापूर आला आहे. सेलेब्सह चाहत्यांनी या क्यूट भावी आई बाबाला शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा-ब्लॉकबस्टर चित्रपटांनी बनवली जोडी,करिश्माने अचानक गोविंदासोबत काम करणं केलं बंद
राहुल वैद्यने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेलीव्हिजनवरूनच सर्वांसमोर तिला प्रपोज केलं होतं. 8 नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता आणि त्याचवेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती. अशाप्रकरे पहिल्यांदाच राहुलने थेट टीव्हीवर त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.