आज आयपीएल 2022 मध्ये 42 वा सामना खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये पुण्याच्या एमसीए मैदानावर सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालाली लखनौ टीम लयीत दिसत आहे. दुसरीकडे पंजाबने कसबसं स्वत:चं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल…हे दोन मित्र शुक्रवारी आयपीएलच्या मैदानात एक दुसऱ्याविरोधात उभे राहणार आहेत.
राहुलच्या नेतृत्वातील लखनौच्या संघाने पाच विजय मिळवले आहेत. लखनौला तीन पराभवाला सामोरं जावे लागलेय. लखनौचा संघ 10 गुणांसह चौथ्या क्रमांकवर आहे. तर पंजाबचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबच्या संघाने आठ सामन्यात चार विजय मिळवले आहेत.
पंजाब किंग्सची संभावित प्लेइंग 11 : मयंक अग्रवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिविंगस्टोन, जॉनी बेयरस्टो, जितेश वर्मा, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह