अलीगढ, 10 एप्रिल : गुजरात टायटन्स विरुद्ध केकेआरला विजय मिळवून देणारा रिंकू सिंह सध्या चर्चेत आहे. वडील घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवायचं काम करायचे. रिंकू सुद्धा त्यांना मदत करायचा. मोठा भाऊ रिक्षा चालवायचा. इतकंच काय तर स्वत: घरकामही करायचा. रिंकूचं नशिब आयपीएलने बदललं. गेल्या पाच वर्षात दुखापतींसह बीसीसीआय़कडून बंदीच्या कारवाईचा सामना केलेला रिंकू सिंह पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला.
रिंकू अलीगढचा आयपीएल खेळणारा पहिला खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने गोलंदाजी करणारा रिंकू एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालाय. २०१२ पासून क्रिकेटनं त्याचं आयुष्य बदललं. तर २०१७ च्या आयपीएलने त्याच्या कुटुंबाचं नशीब बदललं.
Rinku Singh : तीन दिवसांपूर्वी ज्याने कौतुक केलं त्यालाच रिंकूने चोपले; कोण आहे यश दयाल?
रिंकूची आई मीना देवी सांगतात की लहान असतानाच रिंकूला वाटायचं की क्रिकेटचा खेळच त्याचं नशीब बदलू शकतो. सिलिंडर पोहोचवणाऱ्याच्या पाच मुलांपैकी एक रिंकू हा शाळेत असल्यापासूनच क्रिकेटमध्ये रमायचा. पण परिस्थिती अशी होती की क्रिकेट खेळणं कठीण असायचं. वडील त्याला नेहमी मारायचे. पण भावांनी रिंकूला साथ दिली.
रिंकूच्या भावाची पत्नी आरती यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितलं की, रिंकूचं क्रिकेट खेळणं घरच्यांना आवडत नव्हतं, पण २०१२ मध्ये एका शाळेतील स्पर्धेत जेव्हा रिंकूने दुचाकी जिंकली तेव्हा घरच्यांचं मन बदललं. सुरुवातीला रिंकूने क्रिकेटमधून कमावलेले पैसे कर्ज फेडण्यासाठी खर्च केले. अलीगढमधून आयपीएलमध्ये गेलेल्या रिंकूला या स्पर्धेत इतके पैसे मिळाले की कुटुंबातील कुणीच कधी एवढे पैसे पाहिले नव्हते. घरातील अडचणी दूर झाल्या, जमीन घेऊन घर बांधलं आणि कर्जही फेडलं.
सबकुछ रिंकू! सलग 5 षटकारांसह नोंदवले 5 विक्रम; IPLच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं
रिंकूने २०१७ पासून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली. पंजाब किंग्जने त्याला खरेदी केलं होतं. तेव्हा रिंकूला १० लाख रुपये मिळाले होते. तर २०१८ मध्ये केकेआरने त्याला ८० लाख रुपयांमध्ये घेतलं. त्यावेळीही रिंकूला कोणी ओळखत नव्हतं. मात्र उत्तर प्रदेशातील डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली होऊ लागली. त्याच्या यशामुळे कुटुंबाचीही परिस्थिती सुधारत गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.