मुंबई, ९ एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज 13 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात केकेआरने गुजरातचा दारुण पराभव केला. केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंह याने शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेल्या 5 सिक्समुळे हा सामना केकेआरने जिंकला. केकेआरने गुजरातला त्यांच्या होम ग्राउंडवरच पराभूत केले असून 3 विकेट्स राखून विजय मिळवला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध केकेआर यांच्यात सामना पारपडला. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला असून केकेआरच्या फलंदाजांनी अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातकडे झुकणारा सामना आपल्या झुंजार खेळीने आपल्याकडे खेचून आणत विजय मिळवला. सुरुवातीला गुजरातचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी गुजरातसाठी शुभमन गिलने 39, सहाने 17, साई सुदर्शनने 53, अभिनव मनोहरने 14, विजय शंकरने 63 धावा केल्या. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आजारी असलयाने राशीद खान याने संघाची धुरा सांभाळली.
History created by Rinku Singh.
What a finish. pic.twitter.com/NDAiGjQVoI
— Johns. (@CricCrazyJohns) April 9, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.