मुंबई, 11 मे: सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांसाठी कन्सल्टंट पदावर आदिवासी व्यवहार मंत्रालयात नोकरी करण्याची संधी आहे. अंडर-सेक्रेटरी (इस्टॅबलिश), आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी रिक्त जागा भरण्यासाठी माजी सरकारी अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. भारत सरकारच्या मंत्रालय किंवा इतर विभागांत काम केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवार ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. 14.05.2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. या पदांची नावं, रिक्त जागा, कामाचे ठिकाण, निवडीचे निकष व अर्ज कसा करायचा, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलं आहे.
पदांची नावं व रिक्त जागा
मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, कन्सल्टंट या पदासाठी दोन रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत.
कामाचे ठिकाण नवी दिल्ली असेल.
मासिक वेतन
मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांना मासिक वेतन खालीलप्रमाणे दिले जाईल.
– उमेदवारांना सेवानिवृत्तीच्या वेळी असलेले मूळ वेतन – बेसिक पेन्शन + वाहतूक भत्ता यानुसार निश्चिती करून वेतन दिलं जाईल.
SSC CHSL Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1600 जागांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अप्लाय
कमाल वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 63 वर्षांपेक्षा जास्त असू नये.
पात्रता
मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, भारत सरकारच्या मंत्रालय किंवा कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये सेक्शन ऑफिसर, अंडर सेक्रेटरी किंवा समकक्ष स्तरावरील सेवानिवृत्त सरकारी अधिकारी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
निवडीचे निकष
कन्सल्टंट्सचे कॉन्ट्रॅक्चुअल एंगेजमेंट शॉर्टलिस्टिंग आणि त्यानंतरच्या व्हिवा-व्हॉसवर आधारित केले जाईल.
IPS Success Story: 12वी झाले नापास, वेळप्रसंगी रस्त्यावरही झोपले अन् झाले सिंघम; दबंग ऑफिसरची कहाणी
अर्ज कसा करायचा
मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14.05.2023 पर्यंत दिलेल्या अर्जाच्या प्रोफॉर्मामध्ये अर्ज करावा.
MH Board Results 2023: 10वी, 12वीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या’ तारखेला लागणार रिझल्ट
अर्ज पाठवण्याचा पत्ता
अंडर सेक्रेटरी (एस्टॅबलिशमेंट), मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, रूम नंबर 400 सी, सी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
इ मेल अॅड्रेस – reema.sharma@nic.in यावर उमेदवार त्यांचे विहित नमुन्यात भरलेले अर्ज पाठवू शकतात.
या भरती प्रक्रियेसंदर्भातील इतर कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स रिक्रुटमेंट 2023 ची अधिकृत अधिसूचना वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.