रत्नागिरी, 25 एप्रिल : कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटकही करण्यात आली आहे. सोमवारी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आली. त्यांसोबत आणखी दोन सहकाऱ्यांनाही अटक केली असून तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.
रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून इशारा दिल्यानंतरही स्थानिकांकडून आंदोलन सुरूच ठेण्यात आलं आहे. अनेक आंदोलक सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या मांडून होते. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे.
ट्रक चालकाला चक्कर आली आणि भयंकर घडलं, VIDEO पाहून अंगावर येईल काटा
दरम्यान, राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी पोलीस प्रशासन आता सज्ज झाले आहे. रत्नागिरीसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून अधिकची पोलीस कुमक रत्नागिरीत मागवण्यात आलीय. यामध्ये शेकडो अधिकारी आणि 1800 पोलीस कर्मचारी असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. चोख बंदोबस्तात रिफायनरीचे ड्रोन सर्वेक्षण व माती परीक्षण करण्यात येणार आहे. तसेच 3 एस आर पी एफ च्या तुकड्या देखील आज रत्नागिरीत दाखल होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.