मुंबई, 21 एप्रिल : पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे काही जुन्या वास्तूंच्या शोधासाठी उत्खनन केलं जातं. अशातच रोमच्या बाहेर ‘व्हिला ऑफ क्विंटिली’ इथे नुकतंच उत्खनन करण्यात आलं. या उत्खननात अतिशय अनोख्या वाईन फॅक्टरी किंवा वायनरीचे अवशेष सापडले आहेत. वाया अॅप्पिया अँटिका महामार्गावर स्थित ही तिसऱ्या शतकातील इमारत त्या काळातील प्राचीन वैभव आणि कलात्मकता दर्शवते. ‘आज तक’ने याबद्दल वृत्त दिलंय.
कोणत्याही प्राचीन प्रॉडक्शन साइटवर असं काहीही कधीच पाहायला मिळालं नव्हतं. हा परिसर उत्साह वाढवणारा आहे. अभिजात रोमन लोकांनी त्यांची सामाजिक आणि राजकीय स्थिती राखण्यासाठी विस्तृत सजावट केली होती, तसंच थिएटर बांधून त्यात कार्यक्रम केले होते, असं हे ठिकाण दर्शवतं. पुरातन वास्तूवरील एका नवीन लेखात या शोधाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.
क्विंटिलीचा व्हिला
लेडच्या पाण्याच्या पाइपवर कोरलेल्या नावांवरून असं कळतं की 24 हेक्टरचा प्राचीन रोमन व्हिला क्विंटिली बंधूंच्या मालकीचा होता, ज्यांनी एडी 151 मध्ये रोममध्ये सल्लागार म्हणून काम केलं होतं. रोमन सम्राट कोमोडसने 182/3 CE मध्ये या भावांची हत्या केली. या व्हिलासह त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
यामध्ये विविधरंगी संगमरवरी फरशा, उत्तम दर्जाची शिल्पं आणि प्रसिद्ध बाथहाउस आहे. ही जागा सजावटी वास्तूकलेसाठी फार पूर्वीपासून ओळखली जाते. कोमोडसच्या कारकिर्दीत रथ शर्यतींसाठी एक सर्कस बांधली गेली होती, ज्याबद्दल फार लोकांना माहिती नव्हती. 2017-18 पासून या सर्कसच्या सुरुवातीच्या गेटच्या शोधासाठी उत्खनन सुरू करण्यात आलं होतं. या उत्खननादरम्यान एका अनोख्या वायनरीच्या सुरुवातीच्या खुणा समोर आल्या होत्या.
हा मोठा परिसर कोमोडसच्या कारकिर्दीनंतर सर्कसच्या ओपनिंग गेटवर बांधला होता. यामध्ये प्राचीन रोमन वायनरीमध्ये आढळणारी वैशिष्ट्यं आहेत. फूटप्रेस, दोन वाईन प्रेस, द्राक्षे गोळा करण्यासाठी एक व्हॅट आणि ते साठवण्यासाठी मातीची मोठी भांडीही आहेत. या सोबतच वाइन फर्मेंट करण्यासाठी भुयारी तळघरही होतं; पण या ठिकाणी जी सजावट व व्यवस्था आढळते ती इतर कोणत्याही प्राचीन स्थळावर आढळत नाही. यामध्ये सगळीकडे मार्बल टाइल्स लावण्यात आल्या आहेत. तसंच इथे वॉटरप्रूफ प्लास्टरऐवजी लाल रंगाच्या ब्रैकिया मार्बल्स लावण्यात आल्या होत्या. हे ठिकाण पाहून तिथल्या भव्यतेचा अंदाज येतो.
कुस्करलेल्या द्राक्षाचा लगदा आणखी दाबण्यासाठी दोन मोठ्या मेकॅनिकल लीव्हर प्रेसदेखील आहेत. दोन्ही ठिकाणी, द्राक्षं कुस्करून आणि दाबून काढलेला रस एका आयताकार व्हॅटमध्ये जातो. जिधे सम्राट गॉर्डियनच्या नावाचा शिक्का (244 ईसी) दिसतो. यावरून या जागेच्या बांधकामाची तारीख कळते.
यानंतर, द्राक्षाचा रस कारंज्याप्रमाणे सुमारे एक मीटर उंच एका मास्कद्वारे ओतला जात असेल. तो एका रोमन निम्फेमसारखा दिसतो. द्राक्षाचा रस येण्या-जाण्यासाठी लेडच्या पाईपने बनलेली एक अंडरग्राउंड सिस्टिम लावलेली आहे. तिथून हा रस 16 मातीच्या भांड्यांमध्ये टाकला जायचा. ते भांडे एका माणसाएवढे होते. अशा 8 घागरींचे अवशेष उत्खननादरम्यान सापडले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.