मुंबई, 1 एप्रिल : शुक्रवार पासून आयपीएल 2023 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने धोनीच्या चेन्नई संघाचा पराभव केला. या सामन्यानंतर आता रविवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघामध्ये सामना रंगणार आहे. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना पारपडणार असून तो पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
तब्बल 2 वर्षांनी आयपीएलचे सामने पुन्हा संघांच्या होम ग्राउंडवर खेळवले जाणार आहेत. रविवारी 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना पारपडणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी चाहत्यांनी एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या तिकीट घराबाहेर रात्रीपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सामन्याची तिकीट काढण्यासाठी लोक रात्रभर रांगेत रस्त्यावर बसून आहेत. तर तिकीट काढण्याकरीता आलेल्या लोकांची गर्दी सावरताना स्थानिक पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. मुंबई आणि आरसीबीमध्ये हा रोमांचक क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून सध्या तिकीट घराबाहेर लागलेल्या लांब रांगांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
The fans to come for RCB vs MI match tickets in Chinnaswamy stadium, Bengaluru.
Many fans were standing since 3 o’clock in the night. pic.twitter.com/ouo0L8m01K
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 1, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.