मनमाड (नाशिक) 03 मे : मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुभ मंगल सावधान म्हणत लग्नसोहळ्यांची धूम सुरू झाली आहे. गुरू ग्रहाच्या अस्तामुळे एप्रिल महिन्यात लग्न सोहळे खोळंबले होते. त्यामुळे लग्नाशी संबंधित अनेक व्यावसायिकांना त्याचा फटका बसला. मात्र, आता मे आणि जून महिन्यात मुहूर्त असल्यानं मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे होणार आहेत.
मे महिन्यात 14 तर जूनमध्ये 12 लग्नतिथी असून लग्नसोहळे सुरू झाल्यामुळे मंगल कार्यालय, लॉन्स, आचारी, मंडप, फूल विक्रेते, बॅन्ड, डीजे, बस्ता, फर्निचर, भांडी विक्रेते आदींसह या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विवाहासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार पेठेवर असणारे मंदीचे सावट कमी झाल्यानं सर्वाना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मंगल कार्यालय संचालक विकास काकडे यांनी सांगितले.
सर्व कार्यात शनिची साथ मिळेल हमखास; यंदाच्या शनि जयंतीला करा हे महत्त्वाचे उपाय
तुमच्या शहरातून (नाशिक)
मे आणि जून महिन्यात विवाहांसाठी असलेल्या तिथी –
मे महिन्यात एकूण 14 लग्नतिथी – 2,3,4,7,9, 10,11,12,15,16,21,22,29, आणि 30
जून महिन्यात एकूण 12 मुहूर्त –
जून महिन्यातील लग्नतिथी :- -1,3,7,8,11,12,13,14,23,26,27, आणि 28
बुद्ध पौर्णिमेला लागणारं चंद्रग्रहण विशेष योगात; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम
जेव्हा सूर्य गुरूच्या धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास असतो. खरमासाचे दिवस अशुभ काळ म्हणून गणले जातात, त्यामुळे लग्न, मुंडन, गृहप्रवेश यासारख्या गोष्टींना शुभमुहूर्त मिळत नाहीत. सध्या खरमास संपला असल्यानं शुभ कार्यांना पुन्हा प्रारंभ होणार आहे. खरमास संपल्याने लगेच जावळ/मुंडन विधीला शुभ मुहूर्त मिळाले. पण. लग्न आणि गृहप्रवेशांना मात्र शुभ मुहूर्त 27 एप्रिलनंतर मिळण्यास सुरुवात झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.