आशिष कुमार (पश्चिम चंपारण), 16 मे : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. काही मिनीटांपूर्वी लग्न झालेल्या मुलाने थेट मंडपातून पळ काढल्याची घटना घडली आहे. जे वाहन सजवून भाड्याने आणले होते त्या वाहनातून नवरदेवाने अचानक पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुलीकडच्यांनी याची शहानिशा केल्यास तो कोणतेही कारण न सांगता पळून गेल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी नवरदेवाच्या वडिलांना पकडून ठेवले आहे.
हे प्रकरण बैरिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. गया जिल्ह्यातील टेकरी पोलीस स्टेशन हद्दीतील गिद्धौरा गावातून लग्नाची मोठी मिरवणूक काढण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास पाच बसेस, अनेक आलिशान वाहने, बँड-बाजासह मिरवणूक मोठ्या जल्लोषात वधूच्या दारात पोहोचली. द्वारपूजेनंतर वरमाळाचा कार्यक्रम झाला. पाहुण्यांचा पाहूणचार झाल्यानंतर वऱ्हाडी झोपण्याच्या तयारीत होते. हे सगळं सुरू असताना बोहल्यावर चढणाऱ्या मुलाने थेट फुलांनी सजवलेल्या गाडीत बसून पळ काढला.
यानंतर मुलीच्या कडच्यांनी शोध सुरू केला, यावेळी मुलीच्या बाजूने आरोप आहे की, वराचे प्रेमसंबंध असल्याने तो मंडपातून पळून गेला. मात्र, वराच्या वडिलांनी याबाबत कोणतीही स्पष्टता व्यक्त केली नाही. मुलीच्या लोकांनी मुलाच्या वडिलांसह काहींनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सध्या पंचायत बसवण्यात आले आहे. लग्नात खर्च केलेले आणि वराला भेट म्हणून दिलेले सुमारे पाच लाखांचे फर्निचर व इतर साहित्य परत करण्याची मागणी मुलीच्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस अधिकारीप्रणय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्ष आपसात पंचाईत करत असून, याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार देण्यात आली नाही.
पंचायतीदरम्यान मुलीच्या बाजूने 7.65 लाख रोख रक्कम आणि फर्निचरसह इतर वस्तू लग्नातील खर्च म्हणून परत करण्याची मागणी केली आहे. लग्नापूर्वी वराच्या पलायनाच्या घटनेनंतर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा करून हे प्रकरण सोडवण्यात येत आहे. मुलीच्या बाजूने कोणालाही ओलीस ठेवलेले नाही. खर्च केलेली रक्कम परत करणे बंद करण्यात आले आहे, यात वराच्या वडिलांचा कोणताही दोष नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.