शाश्वत सिंग (झाशी), 17 मे : उत्तर प्रदेशमध्ये कुठे काय होईल याचा आपण अंदाज बांधणे कठीण आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रमुख शहर मानले जाणाऱ्या झाशीमध्ये एक जबरदस्त घटना समोर आली आहे. एक नववधू तिचं लग्न थांबवून थेट परीक्षेला गेल्याने जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. चक्क ती वधूच्या वेशात परीक्षा हॉलमध्ये पोहोचलेल्या तिला पाहून सर्वांनाच धक्का बसला.
ही घटना झाशीच्या रक्सा भागातील डोंगरी गावात राहणाऱ्या कृष्णा राजपूतचा 15 मेच्या रोजी यशपाल सिंहसोबत विवाह झाला. 16 मे रोजी इतर धार्मिक विधी होते. या दरम्यान मुलीची बीए शेवटच्या वर्षातील समाजशास्त्राची परीक्षा 16 मे रोजीच होती. अशा स्थितीत मुलगी थेट मंडपातून परीक्षा देण्यासाठी गेल्याने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुंदेलखंड विद्यापीठात 16 मे रोजी बीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा होती. कृष्णा राजपूतचे परीक्षा केंद्र प्रेम नगर येथील विवेकानंद पदवी महाविद्यालयात होते. 16 मे रोजीच कृष्णा लग्नाच्या सात फेऱ्या घेणार होती. दरम्यान परंपरेनुसार, मुलीने एकदा लग्नाचा पेहराव केल्यानंतर इतरत्र कुठेही जाण्याची प्रथा नाही.
परंतु मुलीने निर्णय घेतला की ती आधी परीक्षा देईल आणि मगच लग्नाच्या सात फेऱ्या घेईन. यादरम्यान, मुलाकडून हे लग्न मोडून घरी परत जाण्याचा आग्रह केला परंतु मुलीने मुलाकडच्याना सांगितलं, अभ्यास आणि लग्न या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे मी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे यानंतरच लग्न करेन.
बिअर प्यायल्याशिवाय लागत नाही ‘किक’, कुठली आहे ही बाईक? वाचा प्रकार काय?
महापालिका निवडणुकीमुळे काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्वामी विवेकानंद पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य श्यामजी मिश्रा यांनी सांगितले. त्यात 16 मेच्या परीक्षेचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.