चूरू, 29 एप्रिल : राजस्थानच्या चुरू शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील वॉर्ड क्रमांक 12 येथील अथुना मोहल्ला येथे राहणाऱ्या एका महिलेने पतीला घरजावई बनवण्यासाठी चांगलाच हट्ट केला आहे. तर पत्नीच्या या हट्टामुळे ती गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी राहत आहे. या हट्टीपणामुळे पत्नी बराच काळापासून आपल्या माहेरी राहते आहे. तर तेच दुसरीकडे तिच्या पतीचे हाल होत आहेत. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत लिखित तक्रार दिली.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
चुरूच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या सीकर जिल्ह्यातील बलरा गावातील रहिवासी असलेल्या शाहरुख खानने तक्रारीत सांगितले की, नोव्हेंबर 2016 मध्ये त्याचा विवाह सोनम खानशी (रा. थुना मोहल्ला, चुरू) मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाला होता. पण लग्नानंतर त्याची पत्नी सोनम फक्त 20 दिवसच सासरी राहिली आणि लग्नानंतर 20 दिवसांनी ती आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने सासरी येण्यास नकार दिला.
हे प्रकरण इथेच थांबले नाही तर पत्नीने पतीला माहेरी बोलावून घेतले. तिने त्याला सहा महिने तिथे थांबवले. यासोबतच त्याने त्याच्या आई-वडिलांना सोडून पत्नीच्या माहेरी येऊन घर जावई बनून राहावे, यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र, शाहरुखने सासरच्या घरी राहण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान त्यांना एक मुलगा झाला आहे. तरीसुद्धा पत्नी नीट वागत नसल्याचे शाहरुखचे म्हणणे आहे. ती पुन्हा पुन्हा त्याच्यावर घरजावई बनण्यास दबाव टाकत आहे. तर त्याला पत्नीच्या माहेरी नाही राहायचे. यावरून दोघांमध्ये वाद झाला. घरच्यांनीही याबाबत तिच्याशी चर्चा केली. पण उपयोग झाला नाही.
शाहरुखचे नातेवाईकही त्याच्या पत्नीच्या माहेरी गेले. मात्र, त्याची पत्नी सोनम खान अद्याप शाहरुखकडे आलेली नाही. शाहरुखने तिच्याशी अनेकवेळा संपर्क करून तिला वैवाहिक संबंध जपण्यास सांगितले. मात्र, सोनमने त्याच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या हे प्रकरण समुपदेशनासाठी महिला सुरक्षा आणि सल्ला केंद्राकडे देण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.