मुंबई, 07 मे : अग्निला पृथ्वीवरील सूर्याचा प्रतिनिधी मानलं जातं. सूर्य हा जगाचा आत्मा आणि विष्णूचे रूप असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अग्नीसमक्ष फेरे घेणं म्हणजे जणू परमपित्यासमोर फेरे घेणं होय. अग्नी हे एक माध्यम आहे ज्याद्वारे देवतांना यज्ञ अर्पण केल्याची खात्री मिळते. अशा प्रकारे सर्व देवतांच्या साक्षीनं अग्नीच्या भोवती फेरे घेऊन पवित्र बंधनात बांधले जाण्याचा नियम धर्मग्रंथात करण्यात आला आहे.
वैदिक नियमानुसार लग्नात चार फेऱ्या घेण्याची पद्धत आहे. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये वधू पुढे चालते तर चौथ्या फेरीत वर पुढे चालतो. या चार फेऱ्या चार पुरुषार्थांचे प्रतीक आहेत- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अशाप्रकारे तीन फेऱ्यांतून तीन पुरुषार्थांमध्ये वधूला (पत्नी) प्रधानता असते, तर चौथ्या फेऱ्यातून मोक्षमार्गावर चालताना पत्नीला वराच्या मागे जावे लागते.
मंगळसूत्र –
लग्नाच्या वेळी वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात. महाराष्ट्रासहित दक्षिणेकडील राज्यांमध्ये मंगळसूत्र घातल्याशिवाय विवाह सोहळा अपूर्ण मानला जातो. इकडे सप्तपदी (सात फेरे घेणे) पेक्षा मंगळसूत्राला अधिक महत्त्व आहे. मंगळसूत्रात काळ्या रंगाचे मनी आणि सोन्याचे मनी असणे अनिवार्य मानले जाते. यामागे एक श्रद्धा आहे की मंगळसूत्रामुळे स्त्रिच्या सौभाग्याचे अशुभ गोष्टींपासून रक्षण होते. काळ्या रंगाचे मनी दृष्ट लागण्यापासून संरक्षण करतात आणि शारीरिक उर्जेची हानी टाळतात. मांगलिक दोषांच्या निवारणासाठी हा नियम प्रचलित झाला असावा, असे सांगितले जाते.
गिफ्ट म्हणून मिळालेल्या या वस्तू घरात ठेवू नये; अडचणी-संकटांचे बनू शकतात कारण
सिंदूर –
लग्नाच्या वेळी वराकडून वधूच्या भांगेत सिंदूर भरण्याच्या विधीला काही ठिकाणी ‘सुमंगली’ असं म्हणतात. यानंतर पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत विवाहित महिला भांगात कायम सिंदूर (कुंकू) भरतात, हे विवाहित असण्याचे प्रतीक आहे. सिंदूरमध्ये पाऱ्यासारख्या धातूचे प्रमाण जास्त असल्यानं चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळे मर्म स्थानाला बाह्य वाईट प्रभावापासून संरक्षण मिळते. अशुभ दोषांच्या निवारणासाठी शास्त्रात स्त्रियांना भांगामध्ये सिंदूर भरण्याचा सल्ला दिला आहे.
अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.