आशुतोष तिवारी, प्रतिनिधी
रीवा, 22 मे : तुम्हीही अनेक लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी झाले असाल. मिरवणुकीत आलिशान वाहनेही नेण्यात येते. मिरवणुकीत वरासाठी आलिशान वाहने वापरली जातात. मात्र, सध्या मध्यप्रदेशातील रीवा येथील लग्नाची मिरवणूक खूप चर्चेत आहे. ही मिरवणूक रेवाच्या परिया गावात राहणाऱ्या पटेल कुटुंबाची आहे, जिथे मिरवणुकीत शेकडो ट्रॅक्टर जमा करण्यात आले.
नेमकं काय घडलं –
लगन मुहूर्त लवकर आल्यामुळे वाहनांची व्यवस्था होऊ शकली नाही, असे सांगण्यात आले. मग काय, आजूबाजूच्या गावातून शेकडो ट्रॅक्टर मागवण्यात आले, त्यात वऱ्हाडी लोक बसले आणि पुढे डीजेच्या तालावर गाडीत बसून वरात लग्नासाठी लग्नस्थळी पोहोचले. या संपूर्ण ट्रॅक्टर मिरवणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आजकाल लग्नकार्यामुळे वाहने मिळत नाही आहेत. रेल्वेमध्येही सीट्स भरल्या आहेत. लग्नसराईच्या मुहूर्तामुळे चारचाकी वाहनेही गुंतली आहेत. अशा स्थितीत बारात जाण्यासाठी वाहने न मिळाल्याने शेतकरी कुटुंबाने ट्रॅक्टरचा आधार घेतला आणि आता ही मिरवणूक चर्चेचा विषय बनली आहे.
पटेल कुटुंबीयांनी अशा पद्धतीने लग्न केले की सर्वांचेच लक्ष राहून गेले. लग्नामधील वाहने न मिळाल्याने वराने ठरवले की आता त्याच्या लग्नाची वरात ही ट्रॅक्टरच्या ताफ्यासह जाईल. काही वेळातच आजूबाजूच्या गावातून बरेच ट्रॅक्टर जमा झाले आणि 18 मे च्या रात्री ट्रॅक्टर मिरवणूक तामरा गावातून निघाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसरीकडे लग्नाची ही वरात पाहून घरातील लोकंही आनंदी झाले. मुलीच्या गावातील लोकांनी वऱ्हाडी लोकांचे जोरदार स्वागत केले. ही वरात तामरा गावात पोहोचताच गावात वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. शेकडो ट्रॅक्टर वधूच्या दारात थांबले, त्यानंतर लग्न पूर्ण रितीरिवाजाने पार पडले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.