अनिरुद्ध जहागिरदार
ठाणे 6 एप्रिल : लग्नसमारंभ, पार्टी किंवा इतर कोणतेही सोहळे असू नवीन कपडे घालायला फार आवडतात. त्याकरिता लोक उत्साहाने नविन आणि महागडे कपडे विकतही घेतात. परंतु एकदा कार्यक्रम आटोपला की ते कपडे कपाटात केवळ पडून असतात. त्यानंतर फार क्वचित त्यांचा वापर होतो. पण आता कोणत्याही कार्यक्रमासाठी नविन कपडे तुम्हाला विकत घ्यायचे नसतील तर तुम्ही ते भाड्याने घेवू शकता आणि कपड्यांचा वापर आटोपला की ते परत करू शकता. जेणेकरून नवीन कपडे घालायची हौस पण भागेल आणि अगदी अर्ध्या किंमती पेक्षा ही कमी दरात आवडीचे कपडे घालता येतील. हे कपडे ठाण्यातील एका दुकानात मिळत आहेत.
कोणते मिळतात कपडे?
तुमच्या शहरातून (मुंबई)
ठाण्यामध्ये ‘रेंटल अटायर’ नावाचे नविन कपडे भाड्याने देणारे दुकान आहे. येथे महिलांसाठी लहंगा, गाऊन, शरारा, घरारा, ड्रेप साड्या, पार्टी गाऊन, प्री-वेडींग गाऊन, मॅटर्नीटी गाऊन, टेल गाऊन, क्रॉप टॉप लहंगा, भारतीय आणि विदेशी पद्धतीचे विविध कपडे उपलब्ध आहेत. पुरूषांच्या कपड्यामध्ये ब्लेझर, टक्सिडो, शेरवानी, नवाबी जोधपूरी, कुर्ते, बंडी, मोदी जॅकेट उपलब्ध आहेत.
किती भाडे?
भाड्याने कपडे देण्याच्या या व्यवसायाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आमच्याकडे 1 हजार रूपयांपासून पुढे भाडे आहे. ज्यात प्रामुख्याने नवरी मुलीच्या कपड्यांना ग्राहकांचा जास्त प्रतिसाद आहे. कपड्यांसोबत या दुकानात विविध प्रकारचे आर्टिफिशियल दागिनेही उपलब्ध आहेत जे भाड्याने दिले जातात. अनेक कलाकारांनीही आपल्या शूटींगकरिता या दुकानातून कपडे भाड्याने घेतलेले आहेत. हे दुकान सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी उघडे असते, असं दुकानाचे मालक पूजन शाह यांनी सांगितले.
कुठे आहे दुकान?
शाम निवास, गोखले रोड, एसबीआय बँकेजवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.