पीयूष शर्मा (मोरादाबाद), 12 मे : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान हे धक्कादायक पाऊल उचलताच मुलास तातडीने जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत चौकशी केली असता या तरुणाला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे ती बीए पास आहे. परंतु हा तरूण पूर्णपणे निरक्षर आहे. मात्र तो सुशिक्षित वधूची मागणी करत आहे. यामध्ये तरुणीने या लग्नास नकार दिल्याने नाराज तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
काँग्रेस नेत्यावर गोळीबार, कारमध्ये दबा धरून बसले होते हल्लेखोर; घटना CCTVत कैद
हे संपूर्ण प्रकरण मुरादाबादमधील आहे अमन असे त्या तरूणाचे नाव आहे. तो मिठाईचा व्यवसाय करतो. दरम्यान, त्याला मुरादाबादजवळील गावातील एक मुलगी पसंत पडली. लग्नाची चर्चा झाली आणि 2 दिवसांपूर्वी मुलीचे वडील आणि कुटुंबीयही मुलाच्या कुटुंबीयांकडे पाहण्यासाठी आले. मात्र मुलाच्या शिक्षणाची माहिती माहिती समोर येताच त्यांनी नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या अमनने विष प्राशन केले.
अमनची आई सुनीता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलीचे नातेवाईक भेटायला आले तेव्हा आम्ही त्यांचा पाहूणचार मोठ्या पद्धतीने केला. त्याचं यथोचित स्वागत करण्यात आलं, यासोबतच त्यांना उत्तम जेवण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सगळा कार्यक्रम छान पार पडला.
पण सगळा मामला मुलाच्या शिक्षणावर येऊन थांबला. मुलीच्या वडिलांच्या माहितीनुसार, त्यांची मुलगी बीए पास आहे. तर अमन अशिक्षीत आहे. त्यामुळेच त्यांनी या नात्याबद्दल नकार दिला. सुशिक्षित मुलीचे लग्न अशिक्षित मुलाशी कसे करायचे, असा सवाल त्यांनी केला. तेव्हापासून अमन तणावात होता. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले.
मुंबई-नाशिक महामार्गावर स्पीड ब्रेकरमुळे 3 गाड्यांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
अमनच्या आईने सांगितले की, गुरुवारी अमन आजीच्या घरी आला होता. येथील लग्न मोडल्याचा राग आल्याने त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. अमन तिचा एकुलता एक मुलगा आहे. त्याने मुलाला खूप समजावले की त्याचे लग्न दुसऱ्या मुलीशी करून देतो. पण त्याच मुलीच्या अट्टाहासापोटी त्याेनी विषारी द्रव्य प्राशन केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.