अखिलेश कुमार (बहराइच), 12 मे : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात लग्न समारंभा वेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही स्थानिकांनी थेट लग्नसमारंभात गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. लोकांना घाबरवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. गोळीबार करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.
दर्गा पोलीस स्टेशन हद्दीतील मन्सूरगंज परिसरात नफत अली यांचा मुलगा बकरीदीच्या घरी लग्नाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लग्नात जमील अहमद आणि रहीम यांनी गोळीबार केला. या दोघांचा गोळीबार करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
‘बापाच्या वयाच्या माणसानं माझ्यावर…’ प्रसिद्ध मॉडेलचा धक्कादायक खुलासा
अशा परिस्थितीत पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. तसेच गोळीबारात वापरलेले पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली.
दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना प्रभारी निरीक्षक आरडी मौर्य म्हणाले की, व्हायरल झालेल्या फोटोची ओळख पटल्यानंतर उपनिरीक्षक नितीन उपाध्याय यांच्या तहरीरवर गुन्हा दाखल करून गोळीबार करणाऱ्या तरुणांना अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लग्नाच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच एकत्र दिसले सनीचा मुलगा आणि होणारी सून, यादिवशी अडकणार लग्नबंधनात
पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तर गोळीबारात सापडलेली पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर मन्सूरगंज परिसरातील कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. याआधीही व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे बहराइच पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.