नकुल कुमार (पूर्व चंपारण), 13 मे : बिहार प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. बिहारमध्ये कित्येक जिल्हे मंदिरांच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान बिहारच्या चंपारणमध्ये काही मंदीरे प्रसिद्ध आहेत. मोतिहारीचा नरसिंग बाबा मठ आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी हनुमानाची पूजा केली जाते.
येथे दररोज शेकडो लोक दर्शन घेतात तसेच हवन आणि तप करण्यासाठी येतात. या मठाशी संबंधित असलेले मुरारी पांडे सांगतात की, नरसिंह बाबा मठाची ही खासियत आहे की जो कोणी अविवाहित मुलगा किंवा मुलगी येथे येऊन हनुमानजींकडे नवस मागतो, त्यांचे लग्न काही दिवसांतच ठरते.
मंदिराच्या कळसावर बसलाय शेषनाग, मंदिरात 9 नागाची कुळं, काय आहे रहस्य?
मठाचे संस्थापक नरसिंह मिश्रा उर्फ नरसिंग बाबा हे मूळचे पूर्व चंपारण जिल्ह्यातील चटिया गावचे रहिवासी होते. ब्रिटीश सरकारच्या जुन्या कोर्ट कॅम्पसमधील ट्रेझरी ऑफिसमध्ये ते गार्ड होते. परंतु ते नेहमी अद्यात्माच्या दृष्टीने विचार करायचे यामुळे त्यांनी हनुमान मंदीर स्थापन केले.
यावर बाबांचे नातू मुरारी पांडे म्हणतात की, माझे आजोबा सुरुवातीपासूनच आध्यात्मिक मनाचे व्यक्ती होते. नोकरीच्या काळात त्यांनी मठाची स्थापना केली.
‘या’ मंदिराला एकही खांब नाही, वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना, पाहा हा VIDEO
त्याकाळी बाबांविरोधात काही लोक होते परंतु ब्रिटीशांच्या तपासात काहीच न निघाल्याने नंतर ब्रिटिश अधिकारीही बाबांचे अनुयायी झाल्याचे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.