विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 16 एप्रिल : ‘गोराई के माजी नगरसेवक बहुत जल्दी विकेट, बचके रहना, देशी कट्टा आ गया है’, अशा आशयाचे मेसेज गोराईचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. याबाबतची तक्रार त्यांनी बोरिवली पोलिसांत दिल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेट्टी हे बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 9 भाजपचे माजी नगरसेवक असून, 2012 ते 2022 पर्यंत ते नगरसेवक होते. त्यांनी फेसबुकवर शिवा शेट्टी या नावाने प्रोफाइल तयार केले असून, 18 एप्रिल, 2022 रोजी साडे बाराच्या सुमारास फेसबुक पोस्ट पाहत असताना ललित सावंत, संदीप शाईन नावाने प्रोफाइल बनवत शेट्टी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर पोस्ट करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी धर्मेश जाधव आणि पूजा मकवाना नावाच्या प्रोफाइलवरून पुन्हा तोच प्रकार करण्यात आला. तर, नुकतेच 29 मार्च, 2013 पासून फुनसुख वांगडू (छोटे) वरून देखील अपमानित करण्यास सुरुवात झाली. तर, 7 एप्रिल रोजी शेट्टी यांच्या फेसबुक पेजवर ‘गोराई के माजी नगरसेवक बहुत जल्दी विकेट, बचके रहना, अशी पोस्ट टाकत त्यात चाकू आणि कुन्हाडचे इमोजी वापरले गेले. तर 8 एप्रिल रोजी फुनसुख वांगडू (छोटे) या फेसबुक प्रोफाइलवरून कालिया और रावण को मारने के लिए देशी कट्टा आ गया है, अशी पोस्ट टाकत चाकूची इमोजी वापरण्यात आली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
वाचा – उत्तर प्रदेशात हाय अलर्ट, CM योगींचे सर्व कार्यक्रम रद्द; कलम 144 लागू
गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकार सुरु आहेत पण, मी दुर्लक्ष केले, तसेच संबंधितांना काही उत्तर दिले नाही, पण आता हे प्रकार अधिकच वाढायला लागल्याने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली, असे शेट्टी यांनी ‘न्युज18 लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 501, 504, 506[2] व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(सी) अंतर्गत अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.