अरुण कुमार शर्मा, प्रतिनिधी
मुंगेर, 13 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मुंगेर जिल्ह्यात खून, गोळीबार यांसारख्या रोजच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंगेर जिल्ह्यातील मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरपूर गावात ही घटना घडली.
वर्चस्वाच्या लढाईत गोळीबाराच्या घटनेत एक तरुण आणि एक बालक जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही उच्च केंद्रात हलवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुफसिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
जखमी चंदन कुमारची काकू बिंदू देवी आणि काका गणेश यादव यांनी सांगितले की, अर्जुन यादव यांचा मुलगा भीषण यादव, जो लष्करात कार्यरत आहे, तो नुकताच सुट्टी घेऊन घरी आला होता. बुधवारी सायंकाळी कोणाशी तरी भांडण झाले. दरम्यान, भीषण आणि त्याच्यासह इतर कुटुंबीयांनी वर्चस्व कायम प्रस्थापित करण्यासाठी गोळीबार सुरू केला. गोळीबारात चंदन (30) आणि अनुभव कुमार (8) गंभीर जखमी झाले.
बुधवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारात लष्करातील जवान भीषण यादव, त्याचा पुतण्या सोनू कुमार आणि शिवम कुमार, लड्डू यादव, मन्नू यादव, वीरू यादव, नकुल यादव आणि इतरांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही जखमींच्या नातेवाइकांनी सांगितले की, भीषण यादव व्यतिरिक्त सर्वजण अवैधरित्या दारूचा व्यवसाय करतात. मुफसिल पोलीस स्टेशनचे प्रमुख दलजीत झा यांनी सांगितले की, शंकरपूर गावातून गोळीबार झाल्याची माहिती आहे. सध्या जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.