लातूर, 23 एप्रिल : केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे आज लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे डॉ. शिवाजीराव पाटिल निलंगेकर सहकारी साखर कारखान्याच्या विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी आले होते. यावेळी जिल्ह्यातील आमदार-खासदारांनी केलेली मागणी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी उधारीवर ठेवली आहे. 2024 ला देखील मीच रेल्वेमंत्री होणार असून तेव्हा बघू, असं म्हणत दानवे यांनी पुन्हा येण्याचे संकेत दिले आहे.
काय आहे मागणी?
केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे आज लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे डॉ. शिवाजीराव पाटिल निलंगेकर सहकारी साखर कारखान्याच्या विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी आले होते. यावेळी आयोजित सभेत लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूर मुंबई रेल्वे आणि पीठ लाईनची मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. या मागनीला पुढे नेत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी देखील मी काही मागनार नाही. मात्र, आईकडे बाळ कधी मागत नाही पण आईला त्याच्या डोळ्यात बघून लगेच कळत असं म्हणून खासदारांची मागणी पुढे केली. यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र 2024 ला देखील मीच रेल्वे मंत्री असणार आहे. त्यामुळे थोडी उधारी करू अस सांगत उधारीचे संबंध चांगले असतात. जरा धीर धरा म्हणून रेल्वेच्या मागणीला अलगदपणे बाजूला ठेवलं. लातूर मुंबई नव्या रेल्वेची लातूकरांची मागणी अनेक दिवसांपासून आहे. रेल्वे मंत्री आज काहीतरी दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र, लातूरकारांच्या मागणीला वेट & वेट म्हणत दानवेंनी पुन्हा रेड सिग्नल दिला आहे.
वाचा – उद्धव ठाकरेंची पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका, एकेरी भाषेतच बोलले
अजित पवार यांचे दानवेंकडून कौतुक
राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदाचं आकर्षण नाही. 2024 कशाला, आमची आताही मुख्यमंत्रिपदावर दाव्याची तयारी आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. दरम्यान, या वक्तव्यावर भाष्य करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोलेबाजी केली. 2004 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले. त्यावेळी देखील राष्ट्रवादीलाच जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. या राजकारणातल्या घटना असून राज्यालाही माहीत आहे. भविष्यात कधी त्यांना 10 ते 20 वर्षांत बहुमत मिळालं, तर अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात. ते एक चांगले धडाडीचे कार्यकर्ते आहेत, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.