रायगड, 28 मार्च : ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा लिंगाणा किल्ल्यावर दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. पनवेल-मुंबईतील ग्रुप ट्रेकिंगसाठी गेला होता. तेव्हा अजय काळे हे दरीत कोसळले. खोल दरीत पडल्यानं काळे यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी पनवेल मुंबई येथील ग्रुप गेला होता. त्यात अजय काळे वय वर्ष ६२ हेसुद्धा होते. खोलदरीत पडल्याने काळे यांचा मृत्यू झाला. किल्ले लिंगाणा हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून सिंगापूरकडून मार्ग आहे.
मिरज : सिव्हिलमध्ये रुग्णाला मृत घोषित केल्यानं भाऊ चिडला, डॉक्टरांवरच केला हल्ला
तुमच्या शहरातून (पुणे)
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथील एक ट्रेकर चा ग्रुप ट्रेकिंग साठी येथे आला होता. यातील अनुभवी ट्रेकर्स असणारे अजय काळे हे ट्रेकिंग दरम्यान चक्कर येऊन खोल दरीत कोसळले. दरी जवळपास ४०० फूट खोल त्याने त्यांना शोधण्यात उशीर झाला आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
वेल्हे तालुक्यातून लिंगाण्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. तिथून पनवेलमधील ट्रेकर्सचा ग्रुप ट्रेकिंगसाठी आला होता. यात अनुभवी असलेल्या अजय काळे यांनी ट्रेकिंगवेळी चक्कर आली. त्यानंतर काळे हे ४०० फूट खोल दरीमध्ये कोसळले. काळे यांच्यासोबत असलेल्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा शोध घेण्यात बराच वेळ गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.