भाग्यश्री प्रधान-आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 3 मे : आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येक महिला आणि पुरुषाची इच्छा असते. अनेक महिला आणि पुरुषांना त्वचा आणि केसांची चमक हवी असते. पण जर केस कुरळे असतील तर ही काळजी घेणे कठीण जाते. यामुळे डोंबिवलीत राहणाऱ्या कुरळे केस असणाऱ्या चार्मी वीच्चीव्होराने यावर उपाय शोधला असून केसांची काळजी घेणाऱ्या विविध वस्तू तयार केल्या आहेत.
कशी झाली सुरुवात?
तुमच्या शहरातून (मुंबई)
डोंबिवलीत राहणाऱ्या चार्मी वीच्चीव्होराचे केस कुरळे आहेत. कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये कुरळ्या केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी हे चार्मीला उलगडत नव्हते. याच वेळी तिने इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतला असता तिला कुरळ्या केसांची काळजी घेणाऱ्या अनेक गोष्टी दिसल्या. मात्र, या गोष्टी अत्यंत महाग असल्याने ती त्या खरेदी करू शकली नाही. त्यानंतर आपण स्वतःच या वस्तू तयार कराव्या अशी कल्पना तिला सुचली आणि तिने कर्ली चार्मी या नावाने आपल्या कंपनीची सुरुवात केली.
कोणत्या बनवल्या वस्तू?
तिने सुरुवातीला पूर्ण केस झाकले जातील असे सॅटीनचे बोनेट बनवले. त्यानंतर विविध रंगांचे सॅटीनचे रबर, केसांना त्रास होणार नाही अशी टोपी , केसांना विविध पद्धतीने बांधता येणारा स्कार्फ, पायनॅपल प्रोटेक्टर, विविध आकारांचे स्क्रंची, केसांना त्रास होऊ नये यासाठी सॅटीनचे उशी कव्हर, या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी बटवे अशा विविध गोष्टी तिने बनवल्या. सॅटीनचा कपडा वापरल्याने केसांना कोणतीही इजा पोहचत नाही. विशेष म्हणजे चार्मीला या सगळ्यात तिची धाकटी बहीण हेतवी तिला मदत करत असल्याचे चार्मी सांगते.
काय आहे किंमत?
या सगळ्या वस्तू 65 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत उपलब्ध असून या वस्तू ती गरजू महिलांकडूनही बनवून घेतल्या जातात. यामुळे त्यांनाही खूप मदत होते. सरळ केस जसे सुंदर असतात तसेच हे कुरळे केस देखील सुंदर असतात ही गोष्ट मला या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवायची आहे असेही चार्मी सांगते.
Thane News : आईने मायेनं आंब्याची पेटी पाठवली, लेकानं लाखोंचा बिझनेस उभा केला! Video
कुठे कराल खरेदी?
वस्तू विकत घेण्यासाठी कर्ली चार्मी या इंस्टाग्राम पेजवर भेट द्यावी लागेल. कर्ली चार्मीच्या वेबसाईटवर वस्तू ऑनलाईन विकत घेता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.