विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 15 मे : नौकरी डॉट कॉमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या दहिसर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. नौकरी डॉट कॉम या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे.
आरोपी रवी कुमार अशोक कुमार शर्मा या 30 वर्षांच्या आरोपीने तक्रारदाराशी नौकरी डॉट कॉम ॲपद्वारे CMA- CGM मर्चंट नेव्हीचे वरिष्ठ एचआर रिक्रूटमेंट ऑफिसर म्हणून संपर्क साधला. व्हॉट्सअॅपवर कागदपत्रे आणि युनिक प्लेसमेंट/CMACGM च्या बनावट ईमेलID द्वारे तक्राराला बनावट जॉइनिंग लेटर पाठवण्यात आले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
आरोपीने तक्रारदाराकडून मेडिकल, स्टे इन कंपनी, इमिग्रेशन, सिक्युरिटी चार्ज, व्हिसा या नावाने 4 लाख 47 हजार रुपये त्याच्या एचडीएफसी बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले. तक्रारदार चेन्नई येथील CMACGM कंपनीत पोहोचले असता फसवणूक झाल्याचं समोर आलं.
दहिसर पोलिसांचे सायबर अधिकारी अंकुश दांडगे यांनी बँक तपशील आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून आरोपी रवीकुमार अशोककुमार शर्मा याला बेगमपूर नवी दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.