गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा दोघांनी मिळून निर्घृण खून केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून करणारे दोघेही आरोपी अल्पवयीन आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आणि महापालिकेतर्फे उभारल्या गेलेल्या रिकाम्या इमारतीमध्ये अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली गेली. या घटनेत मृत पावलेली मुलगी मागील तीन दिवसापासून बेपत्ता होती. पीडित मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि तिचा खून करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन आरोपींना अटक केलं आहे.
मुलीचा खून केल्यानंतर दोन्ही आरोपी मोकाट फिरत होते. मात्र, पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचले आणि दोघांच्याही मुसक्या आवळल्या. चौकशी दरम्यान पोलिसांनी आरोपींना खून करण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा आरोपींनी जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हादरले.
वाचा – लोकांना फसवून ऑनलाईन पैसे काढण्याची गुन्हेगारांची नवी पद्धत, व्हाल आश्चर्यचकीत
या घटनेतील दुसरी एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी पीडितेचा खून केल्या गेला, ती इमारत मागील दीड वर्षांपासून ओस पडली आहे. इथे एखादा सुरक्षा रक्षक असता तर कदाचित एक जीव वाचला असता. आता घटना घडल्यानंतर पोलिसांनी संबधित विभागावर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, पोलिसांना हे शहाणपण आधीच सुचलं असतं तर आज एका मुलीचा नाहक बळी गेला नसता, अशा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहे.
या नंतरही या घटनेतील दोन्ही आरोपींची सुटका होऊ शकते. कारण कायद्यातील तरतुदीनुसार दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना न्यायलय सुधारण्याची संधी देवून त्यांची रवानगी बाल सुधार गृहात करू शकते. मात्र, दोघांनीही केलेला गुन्हा अत्यंत गंभीर (बृटल मर्डर) असल्याने न्यायलयाने आरोपींवर कुठलीही दया दाखवू नये अशीच मागणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.