भागेश्री प्रधान – आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 13 मे: इंडियन प्रिमियर लिग अर्थात IPL मुळं अनेक उदयोन्मुख खेळाडूंना आपल्याला सिद्ध करून दाखवण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. यंदाच्या IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा महाराष्ट्राचा एक खेळाडू सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. आपल्या चमकदार कामगिरीनं मुळचा कल्याणकर असणारा तुषार देशपांडे हा चेन्नईच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज बनला आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर आता तुषार टीम इंडियातील प्रवेशाचे दरवाजे ठोठावतोय. पण त्याचा इथंपर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिलेला आहे.
तुषार कल्याणच्या के.सी. शाळेचा विद्यार्थी
तुमच्या शहरातून (मुंबई)
तुषार देशपांडेची एका सामान्य कुटुंबात जडणघडण झाली. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या तुषारनं मोठा खेळाडू होण्याचं स्वप्न पाहिलं. तो कल्याणच्या के. सी. शाळेचा विद्यार्थी आहे. इयत्ता चौथीमध्ये असल्यापासूनच तूषारने आपल्या खेळाला सुरुवात केली. हळूहळू त्याने अभ्यासाबरोबरच क्रिकेटचा सकाळ संध्याकाळ सराव सुरू केला. सुट्टीच्या दरम्यानही तो क्रिकेटचाच सराव करत असे. उन्हात बसून अभ्यास का करतोस असं विचारलं तर मला उन्हात खेळायचंय. त्यामुळे उन्हात बसायची सवय करून घेत असल्याचं तो सांगत होता, अशी माहिती प्रशिक्षक तुषार सामानिणी यांनी दिली.
संस्काराचा वारसा जपत पूर्ण केलं आईचं स्वप्न
तुषारची आईंनी दोन वर्षापूर्वीच या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी संस्कारांचा वारसा तुषारला दिला आहे. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे आज मोठी उंची गाठणाऱ्या तुषारचे पाय आजही जमिनीवरच आहेत. एखाद्या सामान्य कुटुंबातील मुलगा जेव्हा एखाद्या उच्च पदी पोहचतो त्यावेळी त्याचे पाय जमिनीवर ठेवण्याचे काम त्या मुलाचे पालक करतात. कितीही यश कमवले तरी त्या यशाचा गर्व आपल्याला शिवता काम नये, अशी त्याच्या आईने त्याला दिलेली शिकवण तो विसरलेला नाही, असे त्याचे प्रशिक्षक सांगतात.
सर्वच खेळाडूंसाठी सुरू केली मैदानात जीम
कोरोना काळातील टाळेबंदीच्या दरम्यान जिम बंद असल्याने तुषारने मैदानातच जिम बनवूया अशी विनंती केली. त्यानंतर कल्याण येथील वायले मैदानात त्याने स्वतःच्या खर्चाने जिमच्या वस्तू आणल्या. विशेष म्हणजे हे जिम मैदानात येणाऱ्या सर्व खेळाडूंनी वापरावे असे सांगितले. तो ज्यावेळी कल्याणमध्ये असतो त्यावेळी याच मैदानात सराव करतो. त्यावेळी तोही याच जिमचा वापर करत असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितलं.
केरळचा शिवभक्त तरुण, तब्बल 194 किल्ले केले सर, हमरासबद्दल वाचून वाटेल अभिमान, Video
वायले नगर मैदानाच्या सर्वच माळ्यांबरोबर संबंध
तुषारचा स्वभाव मनमिळावू आहे. वायले नगरच्या मैदानातील सर्वच माळी काम करणाऱ्यांसोबत चांगले संबंध आहेत. एकवेळ मला त्याच्या बद्दल कमी माहिती आहे. पण सर्व माळी त्याला काय हवं नको ते पाहतात, असं तुषारचे वडील सांगतात.
कल्याण सोडून मुंबईकडे जावं वाटलं नाही
क्रिकेटर होण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. सुरुवातीला तुषार क्रिकेट खेळत होता. पण त्यामध्येच करिअर करेल असं वाटलं नव्हतं. पण दहावी नंतर त्यानं क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही खेळाडूला पाच ते सहा वर्ष स्वतः साठी द्यावीच लागतात. त्याप्रमाणे त्यालाही ती द्यावी लागली. कल्याण मधून जाऊन तो मेहनत करत होता. के. सी गांधी शाळेचा तो विद्यार्थी होता. शाळेनंही त्याला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मुंबईतील शाळेत प्रवेश घेण्याचा प्रश्नच नव्हता, असे त्याचे वडील उदय देशपांडे यांनी सांगितलं.
सूर असे जे काळजाला भिडतील, बासरीवाला शुभमचा VIDEO पाहाच
तीन वर्षापासून खेळतोय तुषार
तुषार IPL मध्ये तीन वर्षापासून खेळत असून यावर्षी त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे वडील म्हणून मला त्याचा अभिमान वाटत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. गेले काही वर्ष तो रणजीसाठीही खेळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.