मुंबई, 05 एप्रिल : मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये जागा मिळवताना, स्टेशनवर चढ-उतार करताना बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. यात मोठ्याने आवाज चढवून बोलणं किंवा अंगावर धावून जाण्यापर्यंतचे वाद हे नेहमीचेच असतात. पण आता कर्जत फास्ट लोकलमध्ये झालेला प्रकार धक्कादायक असा आहे. दरवाजा अडवून बसलेल्या प्रवाशाला लोकलमधील प्रवाशांनी बेदम मारहाण केलीय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्जत फास्ट लोकलमध्ये सोमवारी हा प्रकार घडल्याचं समजते. यावेळी लोकलच्या दरवाजात उभा असलेल्या प्रवाशाने वाट अडवून धरली होती. यानंतर संतापलेल्या प्रवाशांनी दरवाजा अडवून धरणाऱ्यांना खाली खेचत मारहाण केली. प्रवाशांनी अक्षरश: लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.
लोकलच्या दारात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यामुळे एका प्रवाशाला बेदम मारहाण, दिवा स्थानकावरचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/6l6KInWz46
— sachin (@RamDhumalepatil) April 5, 2023
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.